इब्राहिमोविच म्हणतो २२,००० प्रेक्षकसंख्येचे मैदान माझ्यासाठी खूप छोटे 

लॉस अँजेलीस : काल मेजर लीग सॉकर लीगमध्ये लॉस अँजेलीस एफसी आणि एलए गॅलेक्सी यांच्यातील सामना २-२ असा बरोबरीत सुटला. या सामन्यात एलए गॅलेक्सी यांनी २-० पिछाडी भरून काढत सामना २-२ असा बरोबरीत सोडवला.
या सामन्यात गॅलेक्सीचा स्टार खेळाडू  ज्लाटन इब्राहिमोविच याला सामन्यावर मोठी छाप टाकता आली नाही परंतु सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने धम्माल केली. त्याला विचारण्यात आले की तुला लॉस अँजेलीसच्या घरच्या मैदानावर खेळताना ‘द व्हिलन’ असल्याचे वाटलेले का? यावर त्याने उत्तर देताना विरोधी संघाच्या घरच्या मैदानाची हाशा उडवली
ज्लाटन इब्राहिमोविच म्हणाला,”२२,००० प्रेक्षक संख्या असणारे हे कॅलिफोर्नियाचे मैदान त्याच्यासाठी खूप छोटे आहे. मला ८०,००० प्रेक्षकांसमोर खेळण्याची सवय आहे. जेव्हा ८० हजार प्रेक्षक तुमच्यासाठी शिट्या वाजवतात तेव्हा तुम्ही तुमच्या क्षमतेवर येता आणि  काहीतरी मोठे कामगिरी करू शकता. पण जेव्हा २० हजार प्रेक्षक शिट्या वाजवतात तेव्हा ते माझा सराव  पाहण्यासाठी आले आहेत असे वाटते, हे मी तुम्हाला आदरने बलतोय.”
ज्लाटन इब्राहिमोविच यंदाच्या मोसमात मेजर लीग सॉकर लीगमधील एलए गॅलेक्सीसोबत जोडला गेला आहे तो या अगोदर मँचेस्टर युनाइटेड, पॅरिस सेंट जर्मेन, बार्सेलोना आणि इंटर मिलन या मोठ्या क्लबसाठी खेळाला आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)