इंदापूर तालुक्यातील पवारवाडी गावचा सुपुत्र झाला आय.ए.एस

जळोची – इंदापूर तालुक्यातील पवारवाडी येथील अविनाश संजीवन शिंदे हा नुकताच आय.ए.एस झाला आहे. त्यास २२६ वी रँक मिळाली आहे.

अविनाश याने इंजिनीअरिंगची पदवी घेऊन एका खाजगी कंपनीत तीन वर्ष नोकरी केली. तीन वर्षानंतर नोकरीचा राजीनामा देऊन यूपीएससीची तयारी करण्यासाठी थेट दिल्ली गाठली.२०१६ मध्ये त्याची आय.आर.टी.एस( इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस) पदी निवड झाली. त्यानंतर २०१७ मध्ये आय.आर.एस( असिस्टंट कस्टम कमिशनर) पदी निवड झाली. मात्र अविनाशचे आय.ए.एस बनण्याचे स्वप्न होते. त्यानुसार पुन्हा अभ्यासाला सुरुवात करून २०१९ च्या यूपीएससीच्या परीक्षेत त्याने आय.ए.एस होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

अविनाश यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा पवारवाडी व माध्यमिक शिक्षण श्री छत्रपती हायस्कूल मानकरवाडी येथे झाले. तर पुढील शिक्षण बारामती येथील विद्या प्रतिष्ठान येथे पूर्ण केले. याच महाविद्यालयात त्याने इंजिनिअरिंग मध्ये बी.ई. मेकानिकल पदवी घेतली. कॉलेेज सुरू असतानाच कॉलेज कॅम्पस सिलेक्शन झाले.

अविनाशला आय.ए. एस. होण्यासाठी आई, वडिल, भाऊ, बहिणी, वहिनी, चुलते राजेंद्र शिंदे (मोटर वाहन निरीक्षक, बारामती) अनिल शिंदे, दाजी शांताराम वाकळे, सागर पाटील या सर्वांचे मोलाचे योगदान लाभले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.