मुंबई – राज्यातील चार वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये राज्याचे साखर आयुक्त कुणाल खेमनार यांची बदली आता मुंबईमध्ये एमआयडीसी सहव्यवस्थापक म्हणून करण्यात आली आहे. तर सांगलीचे जिल्हाधिकारी मंतदा राजा दयानिधी यांची सिडकोचे सहव्यवस्थापक म्हणून बदली करण्यात आली आहे. यासह मराठा विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी संस्थेचे संचालक अशोक काकडे यांची सांगलीला बदली करण्यात आली आहे.
कोणत्या अधिकाऱ्याची कुठे बदली?
1. डॉ कुणाल खेमनार, आयुक्त साखर, पुणे यांची बदली एमआयडीसीचे सहव्यवस्थापक म्हणून करण्यात आली आहे.
2. मंतदा राजा दयानिधी, जिल्हाधिकारी, सांगली यांची सिडकोच्या सहव्यवस्थापक पदावर येथे बदली करण्यात आली आहे.
3. अशोक काकडे, एमडी सारथी यांची जिल्हाधिकारी सांगली येथे बदली करण्यात आली आहे.
4. अनमोल सागर, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बदली भिवंडी निजामपूर मनपा आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्याच आठवड्यात राज्यातील 13 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा चार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार आल्यापासून प्रशासनात मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात येत असल्याचं दिसून येतंय.