IAS Transfers: राज्य शासनाने आज आयएएस अधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण बदल्या जाहीर केल्या असून प्रशासनातील अनेक महत्त्वाच्या पदांवर फेरबदल करण्यात आला आहे. IAS Transfers या आदेशानुसार, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे यांची मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. कृषी विभागातील अतिरिक्त मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी यांची वित्त विभागात अतिरिक्त मुख्य सचिव (आर्थिक सुधारणा) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वैद सिंगल यांची मृद व जलसंधारण विभागाच्या प्रधान सचिवपदी बदली करण्यात आली आहे. IAS Transfers पोकरा (नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प) प्रकल्प संचालक परिमल सिंह यांची कृषी विभागात सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांची आपत्ती व्यवस्थापन विभागात सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. IAS Transfer तसेच, लहु माळी यांची शिवशाही पुनर्वसन प्रकल्प लिमिटेड, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माणिक गुरसाळ यांना दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी जबाबदारी देण्यात आली आहे. राज्य कर विभागातील संयुक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांची मत्स्य व्यवसाय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांची वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे राज्यातील प्रशासकीय कामकाजात नव्या पातळीवर गती येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.