पुणे : बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. पूजा खेडकर यांच्यावर यूपीएससीकडून काही दिवसांपूर्वी कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर काल पटीयाला कोर्टाने पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्याने त्यांच्या अडचणीत अजून वाढ झाली आहे. यानंतर आता पूजा खेडकर यांचे आणखी 7 प्रताप समोर आले आहेत. पूजा खेडकर यांनी तब्बल सात वेळा आपल्या नावात फेरफार करून यूपीएससीची परीक्षा दिल्याचं समोर आलं आहे.
इंग्रजी भाषेमधून नाव देताना पूजा खेडकर यांनी अनेक वेळा त्यांच्या स्वतःच्या नावाचे स्पेलिंग बदलून हा सगळा प्रकार केल्याचे दिल्ली पोलिसांच्या तपासातून आता समोर आले आहे. त्यामुळे आता पूजा खेडकर यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.इतकंच नव्हे तर पूजा खेडकर यांनी वडिलांच्या नावांमध्ये सुद्धा फेरफार केल्याचं समोर आला आहे. पूजा खेडकर यांचा जामीन अर्ज देखील न्यायालयानं फेटाळला आहे. पूजा खेडकर यांचे एक एक कारनामे समोर येत असल्यानं आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
नावात कसे केले बदल?
पूजा खेडकर यांनी जेव्हा पहिल्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली तेव्हा त्यांनी आपलं नाव खेडकर पूजा दिलीपराव असं लिहीलं होतं. दुसऱ्यावेळेला त्यांनी आपल्या नावाचा उल्लेख पूजा दिलीप खेडकर असा केला. तर काही ठिकाणी त्यांच्या नावाचा उल्लेख पूजा मनोरमा दिलीप खेडकर असा देखील आढळून आला आहे. या प्रकारे त्यांनी तब्बल सात वेळा आपल्या नावात फेरफार करून यूपीएससीची परीक्षा दिली होती.