अधिकाऱ्यांनी केला “स्मार्ट सिटी’चा अभ्यास

पुणे – विविध राज्यांतील विकास प्रकल्पांच्या प्रशासन आणि व्यवस्थापनामध्ये दीर्घकाळ काम करणाऱ्या 22 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने नुकताच पुणे “स्मार्ट सिटी’चा अभ्यास दौरा केला. या अधिकाऱ्यांनी पुण्यात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती घेतली व विकासकामांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांचा अभ्यास केला.

पुणे “स्मार्ट सिटी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. राजेंद्र जगताप यांनी सादरीकरणाद्वारे त्यांना विविध प्रकल्पांची व त्यासंदर्भातील सद्यस्थितीची माहिती दिली. या पथकाने सिंहगड रस्त्यावरील “स्मार्ट सिटी’ ऑपरेशन सेंटरला भेट देऊन, येथे चालणाऱ्या एकात्मिक कमांड अँड कंट्रोल प्रणालीची सविस्तर माहिती घेतली. याचबरोबर पुणे “स्मार्ट सिटी’ची एकूण वाटचाल, आणि विविध प्रकल्पांविषयी पुणे “स्मार्ट सिटी’च्या प्रतिनिधींनी पथकासमोर सविस्तर सादरीकरण केले. पुणे “स्मार्ट सिटी’च्या “स्मार्ट पब्लिक बायसिकल शेअरिंग’ सेवा प्रकल्पाचा केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्ये मंत्रालयाने नुकताच गौरव केला आहे. यासह स्मार्ट स्ट्रीट रिडिझाईन (रस्ते पुनरर्चना), स्मार्ट प्लेस मेकिंग, स्काडा स्ट्रीट एलईडी लाइटिंग हे प्रकल्प आणि सध्या सुरू असलेल्या व प्रस्तावित प्रकल्पांबद्दल तपशीलवार माहिती या पथकाला देण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)