मुंबई – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषेत ट्विट करणाऱ्या महिला आयएसएस अधिकारी निधी चौधरींना सेवेतून तातडीने बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली असून १७ मे रोजी निधी चौधरी या आयएएस दर्जाच्या महिला अधिकाऱ्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केले होते. आपल्या ट्विटमध्ये निधी चौधरी यांनी, ‘महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंती उस्तवाबाबतच्या तयारीबाबत नाराजी व्यक्त करतानाच आपण गांधीजींचे चालनावरील छायाचित्र हटवावे, तसेच त्यांचे जगभरातील पुतळे देखील हटवावेत आणि त्यांचे नाव देण्यात आलेल्या संस्था आणि रस्ते यावरूनही त्यांचे नाव हटवण्यात यावे.’ अशी इच्छा व्यक्त केली होती. निधी यांनी आपल्या ट्विटच्या अखेरीस गांधींची हत्या करण्यासाठी नथुराम गोडसे याचे आभार देखील मानले होते.
याच पार्शवभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील निधी चौधरी यांच्या ट्विट विरोधात आवाज उठवला असून त्यांनी प्रशासनाकडे निधी चौधरींना तातडीने बडतर्फ करण्यात यावं अशी मागणी केली आहे. ते म्हणाले, “महात्मा गांधींविषयी आक्षेपार्ह भाषेत ट्विट करणाऱ्या निधी चौधरींना तातडीने बडतर्फ करण्यात यावं अशी आमची मागणी आहे. त्यानी केवळ गांधींविषयी आक्षेपार्ह ट्विट केलं नसून गोडसेचा गौरव देखील केला आहे.”
साध्वी प्रज्ञा सिंहच्या ‘गोडसे देशभक्त होता आहे आणि सदैव राहील’ या वादग्रस्त विधानानंतर तिच्यावर देशभरातून टीका करण्यात आली होती. भाजपतर्फे देखील तिला आपलं वक्तव्य मागे घेण्याचे आणि संपूर्ण देशाची माफी मागण्याचे निर्देश देण्यात आले होते. देशभरातून होणाऱ्या टीकेमुळे आणि पक्षांतर्गत दबावामुळे साध्वीने आपलं वक्तव्य मागं घेत देशाची माफी देखील मागितली होती. मात्र हे प्रकरण ताजे असतानाच आता देशातील आयएएस दर्जाच्या महिला अधिकाऱ्याने देखील महात्मा गांधी यांच्या खुनाचे जाहीर रित्या समर्थन केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
NCP leader Jitendra Awhad in Mumbai: We demand immediate suspension of IAS officer Nidhi Choudhari for her derogatory tweet against Mahatma Gandhi. She gloried Nathuram Godse, this should not be tolerated. (pic of tweet by IAS Nidhi Choudhari on May17,she later deleted the tweet) pic.twitter.com/Ir2lMldQmW
— ANI (@ANI) June 1, 2019