बंगळुरु : बंगळुरू महानगर वाहतूक निगमच्या व्यवस्थापकीय संचालक आणि भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी सी. शिखा यांनी होस्केट व्होलव्हो प्रशिक्षण केंद्रात व्होलव्हो बसचे स्टेअरिंग हाती घेतले. त्यांनी महिला सक्षमीकरणाचे अनोखे उदाहरन घालून दिले आहे.
व्होलव्हो बसची चाचाणी घेतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सी शिखा बस चालवत असताना त्याच्यामागे निगमचे अधिाकरी त्यांना सुचना देत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. टेस्ट ट्रॅकवर त्यांनी या बसची चचाणी घेतली.
#Bengaluru: #BMTC managing director C Shikha drives a Volvo bus on a test-track at the bus training centre. @TOIBengaluru @BBPVedike @dipika_bajpai @IASassociation @Ratnaprabha_IAS @silk_board @MarathahalliBrg @WFRising @sandeeprrao1991 @mathangcito @BalooET pic.twitter.com/umZIoAQHUF
— Rakesh Prakash (@rakeshprakash1) January 14, 2020
अलीकडच्या काळात सी. शिखा या बसची चाचणी स्वत: घेणारऱ्या पहिल्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी ठरल्या ाहेत. त्यांच्या धाडसाचे निगमच्या कर्मचाऱ्यांकडून कौतूक होत आहे.
याबाबत एका मुलाखतीत, सी शिखा म्हणाल्या, सार्वजनिक बाहतुकीचा मला अनुभव घ्यायचा होता. त्याचबरोबर व्होलव्हो चालवण्याचा अनूभव घेण्याची इच्छा होती. त्यामूळे अधिक महिला कर्मचाऱ्यांनी व्होलव्हो चालवण्यासाठी पुढे यावे. बस खरेदीच्या प्रक्रियेचा भाग म्हणून मी बसची चाचणी घेतली.
निगमकडे सहा हजार 400 बस असून 14 हजार चालक आहेत. ते दररोज 36 लाख जणांची वाहतूक करतात.