कांग्रा (हिमाचल प्रदेश) : कार्यलयातील शिपायाच्या मुलीने दहावीच्या परीक्षेत तब्बल 94 टक्के गुण मिळवले… त्याचं कौतुक म्हणून तिला चक्क उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसण्याचा मान मिळाला. तिचा असा सन्मान करणारे अधिकारी होते, आयएएस जतिन लाल.
हिना ठाकूर या मुलीने दहावीत 94 टक्के गुण मिळवून उज्ज्वल यश संपादन केले. ते पाहून लाल यांनी तिला एक दिवस उपविभागीय दंडाधिकारी बनवण्याचा निर्णय घेतला. तो अंमलातही आणला. लाल यांच्या मनार्गदर्शनाखाली हिनाने कार्यालयीन बैठकही घेतली. काही उपयुक्त सूचना केल्या. आलेल्या लोकांनी आपली गाऱ्हाणी हिनापुढे मांडली.
माझं स्वप्न एक दिवसांसाठी का होईना पूर्ण झालं. लाल सरांनी मला स्वप्न दाखवलं आणि पूर्णही केले. मी आधी डॉक्टर बनेन त्यानंतर आयएएस अधिकारी बनेन, असे तिने सांगितले. तर लाल म्हणाले, तिला पुढे काय होणार असे विचारले असता मला आयएएस अधिकारी व्हायचे असे सांगितले. त्यामुळे तिला एक दिवसाचा अनुभव दिला. मी तिच्या बाजूला बसून तिला सांगत असे. बेटी पढाओ उपक्रमाचा भाग म्हणून ही योजना राबवल्याचे त्यांनी सांगितले.
………….