सीडनी : ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी क्रिकेट समालोचनातून निवृत्ती जाहीर केली आहे. यासह, चॅपेल यांनी आपल्या ४५ वर्षांच्या समालोचन कारकिर्दीला निरोप दिला. ७८ वर्षीय चॅपेल जागतिक स्तरावर त्यांच्या खेळाबद्दलच्या दृष्टिकोनासाठी आणि त्यांचे वर्णन करण्याच्या त्यांच्या सरळ पद्धतीसाठी ओळखले जातात. रिची बेनॉड, बिल लॉरी आणि टोनी ग्रेग यांच्यासह चॅपल तीन दशकांहून अधिक काळ ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या समालोचन पथकाचा भाग होते.
चॅपेल यांनी ७५ कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले, त्यापैकी 30 कसोटी सामन्यांमध्ये ते कर्णधार म्हणून खेळले होते.