गगनयान मोहिम : तीन भारतीय अंतराळात जाणार

बंगळुरू – मानव मिशनसाठी वायुदलाने अंतराळ संशोधन संस्थेशी (इस्रो) करार केला आहे. ही माहिती वायुदलाने आपल्या ट्‌विटर खात्यावर दिली. गगनयान असे या मोहिमेचे नाव असून त्या अंतर्गत इस्रो 2021-22पर्यंत भारतातील तिघाजणांना अंतराळात धाडणार आहे. या तिघांची निवड इस्रो आणि वायुदल मिळून ठरवणार असून या तिघांना ते प्रशिक्षणही देणार आहेत.

इस्रोचे प्रमुख के. सिवन यांच्या उपस्थितीत वायुदलाचे एव्हीएम आर. जी. के. कपूर आणि गगनयान मोहिमेचे संचालक आर. हट्टन यांनी या करारावर हस्ताक्षर केले.

सिवन यांनी याबाबत सांगितले की, या मोहिमेअंतर्गत 2022 साली जीएसएलव्ही मार्क-3 या रॉकेटच्या साथीने आधी दोन मानवरहित यान पाठवण्यात येतील. त्यानंतर तीन भारतीयांना अंतराळात सात दिवसांसाठी पाठवले जाणार आहे. ही मोहीम यशस्वी झाली तर भारत अंतराळात माणूस पाठवणारा चौथा देश ठरणार आहे. यापूर्वी रशिया, अमेरिका आणि चीनने अंतराळात मानव पाठवला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.