‘पंतप्रधान मोदींना गोळया घालून ठार करेन’; ‘त्या’ने दिली धमकी

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींना गोळया घालून ठार करेन, असा धमकीचा फोन उत्तर प्रदेशमधील एका व्यक्तीने पोलिसांना केला. हे ऐकताच पोलीस स्टेशनमध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने या व्यक्तीला अटक केली आहे.

माहितीनुसार, नोएडातील एका व्यक्तीने पोलीस कंट्रोलमध्ये फोन करून सांगितले कि, आपण पंतप्रधानांना एका तासामध्ये गोळ्या घालून मारणार आहोत. तसेच त्याने नोएडावर बॉम्ब फेकण्याचीही धमकी दिली. यानंतर तातडीने याबाबत नोएडा पोलिसांना कळविण्यात आले.

पोलिसांनीही त्वरित कारवाई केली आणि मामूरा गावातून हरभजन सिंग (वय ३३, मूळ हरियाणा) तरूणाला अटक केली. दरम्यान, अटकेच्या वेळी आरोपी नशेत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

लॉकडाऊनदरम्यान आरोपीची नोकरी गेली. यामुळे गर्लफ्रेंडही सोडून गेल्याचे त्याने पोलिसांना  सांगितले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.