कुणालने केला संजय राऊतांकडे ‘हा’ हट्ट

मुंबई  : स्टॅंड अप कॉमेडिअन कुणाल कामरा हा नेहमीच वादग्रस्त वक्‍तव्य करून चर्चेत राहतो. यावेळी  तो पुन्हा त्याच्या ट्विटमुळे चर्चेत आला आहे. कुणाल लवकरच  ‘शटअप या कुणाल – २ ’  कार्यक्रमाचा दुसरा सिझन सुरु करणार आहे. मात्र, त्याने हा   कार्यक्रम सुरु करण्यासाठी ट्विट द्वारे एक अट टाकली आहे.  कुणालने शिवसेना खासदार संजय राऊत यांना ‘शटअप या कुणाल’ शोमध्ये आमंत्रित केलं आहे. संजय राऊतांनी निमंत्रण स्वीकारले, तरच या कार्यक्रमाचा दुसरा सिझन सुरु करेन असं ट्विट केलं आहे . त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्याचा  ट्विटची चांगलीच चर्चा रंगली आले आहे. दरम्यान, संजय राऊत हे आता मुलाखत देताना दिसणार का, याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागली आहे.

तत्पूर्वी,  स्टॅंड अप कॉमेडिअन कुणाल कामराने विमानात पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याशी केलेल्या गैरवर्तनामुळे चर्चेत आला आहे. एका विमानात अर्णब गोस्वामी आणि कुणाल कामरा एकत्र प्रवास करत होते. यावेळी कुणाल कामराने अर्णब यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. यासदर्भातील एक व्हिडीओ त्याने ट्विटवर शेअर केला. अवघ्या काही वेळातच हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर अनेकांनी त्याच्यावर टीका केली. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विमान कंपनी इंडिगोनं त्याच्यावर सहा महिन्यांची तर एअर इंडियानं त्याच्या विमान प्रवासावर अनिश्‍चित काळासाठी बंदी घातली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.