मुख्यमंत्री म्हणून आज उद्धव ठाकरे शपथ घेणार
मुंबई -आज शिवतीर्थावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. शिवसेनेच्या राजकीय कारकीर्दचा आणि जडणघडणीत साक्षीदार असलेल्या शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा रंगणार आहे. संध्याकाळी ६ वाजवून ४० मिनिटांनी हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्रिपदासाठी राष्ट्रवादीकडून कोण शपथ घेणार आहे? याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. मात्र राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. अजित पवार आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
पवार म्हणाले, मी आज शपथ घेणार नाही. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेतील, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
तसेच, मी नाराज नाही, मी शपथविधीला जाणार आहे, मी आणि सुप्रिया आम्ही सोबत शपथविधी सोहळयाला जाणार आहे, मी राष्ट्रवादीत होतो आणि राष्ट्रवादीतच राहणार. शरद पवारच आमचे नेते आहेत, असं अजित पवार यांनी म्हटलं.