शिराळा : कोरोना लॉकडाऊनच्या काळात वीज वितरण कंपनीने मनमानीपणे सर्वसामान्यांवर वीज बिले लादली आहेत अशा राज्य सरकारने आपली भुमिका स्वतंत्रपणे मांडावी. दि. 25 जुलै पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उर्जा मंत्र्यांनी कोरोना काळात दिलेली वीज बिले परत घ्यावी. ‘मी लाईटबिल भरणार नाही’ हे जनआंदोलन यापुढील काळात राज्यभरात करण्यात येईल असा इशारा कॉ. धनाजी गुरव यांनी दिला.
यावेळी शिराळा तहसील कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करून मी वीज बिल करणार नाही या जनआंदोलनाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे जेष्ठ नेते कॉ. विजयकुमार जोखे, श्रमिक मुक्तीदल (लोकशाहीवादी) चे प्रवक्ते कॉ. दिपक कोठावळे, कॉ.प्रा. मिलींद साळवे, शिराळा तालुका कामगार परिषदचे अध्यक्ष मारूती रोकडे, कामगार नेते अहमद मुंडे, कॉंग्रेसचे नेते अँड. रवी पाटील, अमोल साठे, दिव्यांग संघटनेच्या स्वाती भस्मे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1272279523111750/
कॉ. दिपक कोठावळे म्हणाले, कोरोनाच्या काळात सरकारने सांगितले म्हणुन आम्ही सर्व शेतकरी कामगार घरी बसुन होतो, तुम्ही सांगितले म्हणुन उद्योगधंदे – कारखाने बंद होते म्हणजेच आजची बेरोजगारी आणि महागाई तुमच्या इच्छेने आणि मर्जीने निर्माण झाली आहे. याच निर्णयात्मक संबंधाने तुम्हीच आता पुढाकार घेऊन लाईट बिले पुर्ण माफ केलेच पाहीजे. वीज बिले माफ करण्याची जबाबदारी सरकारची आहे.
शिराळा तालुका कामगार परिषदेच्या वतीने ना.तहसीलदार कोकाटे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी प्रा. मिलिंद साळवे (सर), सचिन गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते गजानन पवार, सचिन अवघडे, अनिल माने (सर), राजेंद्र माने, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
…..तुम्ही जरा माणसांत या ! कॉ. धनाजी गुरव नायब तहसीलदार कोकाटे यांच्यावर कडाडले.
वीज बिलाच्या मागण्यांचे निवेदन देतेवेळी निवेदनातील मुद्द्यांवर चर्चा करताना नायब तहसीलदार यांनी ‘काय होतय वीज बिल भरायला.. चांगले फोर जी मोबाईल बाळगायला जमतंय की…’ या शब्दात शेतकरी – कामगार वर्गाबद्दल बेजबाबदारीने बेताल वक्तव्य केले.
यावेळी मात्र कॉ. धनाजी गुरव यांनी, ‘साहेब काय बोलताय हे बोलण बरोबर आहे का… शेतकरी कामगार आणि सर्वसामान्यांवर उपासमारीची वेळ असताना हे काय बोलताय तुम्ही…? तुम्ही जरा माणसांत या.. अशा कठोर शब्दात सरकार आणि जनतेचे प्रशासकीय प्रतिनिधी म्हणुन काम करणा-या निवासी नायब तहसीलदारांची कानउघडणी केली.