नाशिक : लोकसभेला माजी मंत्री एकनाथ खडसेंनी जाहीर पाठिंबा देऊन माझा प्रचार केला. मात्र, विधानसभेला शरद पवार गटाच्या उमेदवार, माझ्या नणंदबाई रोहिणी खडसेंचा मी प्रचार करणार नाही, असे केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी स्पष्ट केले आहे.
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेल्या रक्षा यांनी सांगितले की, एकनाथ खडसे भाजपतून राष्ट्रवादीत गेले. ते ज्येष्ठ असून त्यांनी काय करावे हा त्यांचा निर्णय आहे. त्यांच्या प्रचाराच्या परतफेडीची आवश्यकता नाही. लोकसभेला फेक नॅरेटिव्हमुळे विरोधकांना यश आले. विधानसभेत तो चालणार नाही, असा दावाही रक्षा खडसे यांनी केला.