मी कोणाच्याही अन्यायासमोर झुकणार नाही.

नवी दिल्ली – काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशवासीयांना गांधी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या जगात मी कोणालाही घाबरणार नाही. मी असत्याला सत्याच्या मार्गानं जिंकेन आणि असत्याचा विरोध करत मला सर्व गोष्टी सहन करण्याची ताकद मिळावी. मी कोणाच्याही अन्यायासमोर झुकणार नाही. गांधी जयंतीच्या शुभेच्छा,” असं राहुल गांधी म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून देशवासीयांना गांधी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहे.

दरम्यान, हाथरसच्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित युवतीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असलेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वढेरा यांना आज दुपारी यमुना द्रुतगती महामार्गावर अटक करण्यात आली.

उत्तर प्रदेशातील इकोटेक पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला. राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यासह १५३ कार्यकर्ते आणि ५० इतर लोकांवर भारतीय दंड संहितेच्या १५५/२०२०, १८८, २६९, २७० कलमांतर्गत आणि ३ महामारी अ‍ॅक्ट अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.