मी माफी मागणार नाही; राहुल गांधींचा स्पष्टपणे नकार

नवी दिल्ली – काँग्रेस नेता राहुल गांधी यांच्या ‘रेप इन इंडिया’ वक्तव्यावरून आज लोकसभेत मोठा गदारोळ झाला. या विधानावर भाजप खासदारांनी नाराजी व्यक्त केली असून राहुल गांधींनी माफी मागावी, अशी जोरदार मागणी केली आहे. मात्र राहुल गांधींनी माफी मागण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.

राहुल गांधी म्हणाले कि, भाजपशासित प्रदेशांमध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आणि उन्नाव प्रकरणामध्ये एका भाजप आमदार आरोपी आहे. तसेच माझ्या मोबाइलध्ये एक क्लिप आहे ज्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी दिल्लीला ‘बलात्काराची राजधानी’ म्हंटले होते. मी क्लिपला ट्विटरवर नक्कीच शेअर करेल. जेणेकरून लोकही पाहू शकतील.

ते पुढे म्हणाले कि, भाजपा, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यामुळे ईशान्य भारत जळत आहे. त्या मुद्द्यावरुन लक्ष हटवण्यासाठीच नरेंद्र मोदी आणि भाजपा माझ्यावर आरोप करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.