एका मुलाखतीदरम्यान साराला सैफच्या समोर प्रश्न विचारला की, ती करिनाला कोणत्या नावाने हाक मारते? ती करिनाला छोटी आई, आई, मम्मी यापैकी काय म्हणते? यावर उत्तर देत साराने म्हटलं होतं, माझ्या वडिलांनी माझ्यावर कधीही करिना आमची दुसरी आई आहे असा दबाव टाकला नाही.
ज्यामुळे आम्हाला असं काही वाटलंच नाही की आम्ही करिनाला आई म्हणून हाक मारावी. मी करिनाला के नाहीतर करिना म्हणून हाक मारते. पुढे सांगताना ती म्हणाली, आम्ही एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहोत. जेव्हा करिना माझ्याशी पहिल्यांदा बोलली होती तेव्हा ती म्हणाली की, हे बघ तुझी आई खूप छान व्यक्ती आहे.
मला फक्त तुझ्यासोबत मैत्री करायची आहे. तिने कधीच आमची आई होण्याचा प्रयत्न केला नाही. जर मी तिला छोटी आई वगैरे म्हणाली असती तर कदाचित ती स्वतःच माझ्यावर वैतागली असती.