मराठी सिनेमा जास्तीतजास्त प्रेक्षकांपर्यत मी पोहचवणार- अजित अरोरा

प्रसिद्ध निर्माता अजित अरोरा लवकरच “उनाड” ह्या चित्रपटातून मराठी सिनेमा क्षेत्रा मध्ये पदार्पण करणार आहेत. “३७७ ऍबनॉर्मल” या हिंदी वेब सिरिजच्या यशा नंतर अजित अरोरा यांनी मराठी सिनेमा क्षेत्रात मध्ये पाऊल ठेवण्याचे ठरवले.  उनाड हा चित्रपट आताच्या तरुणाईवर आधारित आहे आणि ह्याचे शूट कोंकणच्या सुंदर परिसरामध्ये झाले आहे.

अजित अरोरा यांचे म्हणणे आहे की, “मराठी चित्रपटाची आवड ठेवणारे मराठी प्रेक्षक ह्यांना मराठी चित्रपट हे त्यांच्या चांगल्या लेखन आणि त्यांच्या दर्जा मुळे आवडतात आणि  त्यासाठी ओळखले जातात, त्यावर आपल्या सरकारने प्राईम टाइम मध्ये मराठी चित्रपट दाखवावा याचा जी.आर सुद्धा  २०१५ साली काढलेला आहे आणि तो प्राईम टाईम मध्ये दाखविणे हे बंधनकारक आहे. जेणेकरून प्रेक्षकांपर्यत मराठी सिनेमा हा पोहोचेल आणि साहजिकच आहे कि यामुळे आपल्या लोप पावत असलेल्या मराठी संस्कृतीला प्रोत्साहन मिळेल”. असं ते म्हणाले.

उनाडचे दिग्दर्शन प्रभावशाली आदित्य सरपोतदार ह्यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती अजित अरोरांच्या प्रोडक्शन हाउस  “ऑरोरा प्रोडक्शन्सने” केले आहे. चित्रपटाचे पहिले शेड्युल संपले आहे. आणि दुसऱ्या शेड्युल ची सुरुवात झाली आहे. पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत  हा चित्रपट प्रदर्शित होईल अशी अपेक्षा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.