बॉलीवूड अभिनेत्री वाणी कपूरकडे “बेलबॉटम’, “शमशेरा’ आणि “चंदीगड करे आशिकी’ असे अनेक चित्रपट आहेत. या अभिनेत्रीला नेहमीच समीक्षकांकडून प्रशंसा मिळाली आहे. तिने अनेक बिग बजेट चित्रपट साईन केले असून यासाठी ती खूप उत्साहित आहे.
वाणी कपूर ही स्वत:ला कलाकार म्हणून प्रस्थापित करण्यासाठी उत्सुक आहेत. स्त्री-केंद्रित चित्रपटात मुख्य भूमिका आणि पडद्यावर एक सशक्त भूमिका साकारण्याबाबत वाणीने आपली महत्वाकांक्षा सांगितली आहे.”वॉर’ चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर वाणी कपूर आपल्या कारकिर्दीला योग्य दिशेने घेवून जावू इच्छित आहे.
वाणी कपूर म्हणाली, मी ड्रायव्हिंग सीटवर आहे आणि मी माझा मार्ग स्वतः निवडणार आहे. मी अनेक चित्रपट साइन केले नाहीत, कारण मला चांगले चित्रपट करायचे आहेत. मी स्वतःला सर्वोत्कृष्ट चित्रपटात बघू इच्छित आहे.
मला अशा चित्रपटांचा भाग व्हायचं आहे जिथे लोकांच्या मनावर वेगळी छाप पडेल. चांगल्या सिनेमांमध्ये काम केल्यास आपल्याला वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी मिळते. चांगल्या कामाकडे प्रत्येक दिग्दर्शकाचे लक्ष असते, असे वाणीने सांगितले.