महापौर पाहणीसाठी आल्याने मला तुरुंगात डांबले – नाल्यात पडलेल्या बालकाच्या वडिलांचा आरोप

मुंबई – मुंबईतील गोरेगाव परिसरातील खुल्या नाल्यामध्ये पडलेल्या एका १.५ वर्षीय बालकाचा शोध सुरु असतानाच आता याप्रकरणी नाल्यात पडलेल्या बालकाच्या वडिलांनी प्रशासनावर गंभीर आरोप लावले आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, १० जुलै रोजी मुंबईतील गोरेगाव परिसरातील आंबेडकर नगर येथील सुरज सिंग यांचा १.५ वर्षांचा मुलगा पावसामध्ये खेळताना एका उघड्या नाल्यामध्ये वाहून गेला होता. या घटनेमुळे संतप्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी रस्तारोको आंदोलन देखील छेडले होते. काल सदर प्रकरणाची पाहणी करण्यासाठी शहराचे महापौर विश्वनाथ महादेश्वर आले असता परिसरातील नागरिकांनी विरोधप्रदर्शने देखील केली होती.

दरम्यान, नाल्यामध्ये वाहून गेलेल्या बालकाच्या वडिलांनी प्रशासनावर गंभीर आरोप लावले असून ते म्हणतात, “जेव्हा महापौर सदर प्रकरणाची पाहणी करण्यासाठी आले तेव्हा पोलिसांनी मला तुरुंगात डांबले. माझे मित्र जे माझी मदत करीत आहेत त्यांना पोलीस प्रशासन अटक करतंय. नाले सुरक्षेच्या बाबतीत दुर्लक्ष केल्यानेच आज माझा मुलगा माझ्यासोबत नाहीये.”

Suraj Singh, father of the 1.5 yr old child who fell in a gutter in Ambedkar Nagar area of Goregaon on 10 July: Had there not been negligence, my child could’ve been with me by now. I haven’t received any response. My friend who was helping me was picked up by police #Maharashtra pic.twitter.com/LIsvRBr0HD

— ANI (@ANI) July 12, 2019

Leave A Reply

Your email address will not be published.