मला व्यक्तीगत वादातून शिक्षा सुनावली-परवेझ मुर्शरफ

नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. परंतू, या शिक्षेवर आता परवेझ मुशर्रफ यांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. तसेच हा न्याय नसून ती केवळ हाडवैरातून सुनावली गेलेली शिक्षा असल्याची पहिली प्रतिक्रिया मुशर्रफ यांनी दिली आहे.

पाकिस्तानच्या न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर मुशर्रफ यांच्या पक्षाकडून एक व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यात त्यांनी व्यक्तीगत वादातून शिक्षा सुनावल्याचा आरोप केला आहे. ते उच्च पदावर असून आता ते पदाचा गैरवापर करत आहेत, असा आरोप त्या व्यक्तीचे नाव न घेता मुशर्रफ यांनी केला आहे.

“संबधित लोकांना माझा राग आहे आणि याच वैरातून मला लक्ष्य केले जात आहे. मला किंवा माझ्या वकिलांना बाजू मांडण्याची संधीही देण्यात आली नाही, किंबहुना असे उदाहरण मी कुठेही पाहिले नाही,”असा आरोपही त्यांनी केला आहे.

मुशर्रफ हे पाकिस्तानच्या इतिहासात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले पहिले लष्करशहा ठरले. दरम्यान उपचारांसाठी 2016 मध्ये मुशर्रफ दुबईला गेले ते अद्यापही परतले नाहीत त्यामुळे या शिक्षेच्या अंमलबजावणीर प्रश्नचिन्ह आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.