पुणे : राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहताना दिसत आहे. सत्ताधारी व विरोधक प्रचाराला लागले आहेत. या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा आहे ती बारामती मतदारसंघाची. या निवडणुकीत काका विरुद्ध पुतण्या अशी लढत पाहायला मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि युगेंद्र पवार यांच्यात ही लढत पार पडणार आहे. यादरम्यान अजित पवारांनी एक मोठा खुलासा केला आहे.
काय म्हणाले अजित पवार?
आपण बारामतीतून उभं रहाणार नव्हतो. शिरुर- हवेलीतून उभं राहण्यासाठी नादवलेलो. शिरुर, पुरंदर, सिन्नर विधानसभा मतदार संघातून संधी होती असा खुलासाही अजित पवारांनी शिरुरमधील सभेतून केला. आता तुम्ही माझी काळजी करु नका बारामतीकर पाहून घेतील असं म्हणत बारामतीची परिस्थिती सुधारलीय, असंही अजित पवार म्हणाले.
महायुतीचं सरकार आणायचं आहे- अजित पवार
महायुतीमध्ये समन्वय ठेवण्याचं काम एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी केलं आहे. मागच्या निवडणुकीत झालेले त्रुटी आम्ही सुधारतोय. कारण त्यावेळेस एक वेगळा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला. त्याची किंमत महायुतीला मोजावी लागली. आपल्याला पुन्हा महायुतीचे सरकार राज्यात आणायचे आहे असे अजित पवार म्हणाले.