मी अल्पवयीन : निर्भयातील दोषी सर्वोच्च न्यायालयात

नवी दिल्ली : निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील एका आरोपीने ही घटना घडली त्यावेळी आपण सज्ञान नव्हतो या दिल्ली उच्च न्यायलयाने फेटाळलेल्या दाव्याच्या निर्णया विरोधात सर्वोच्च न्यायलयात अपिल सादर केले. फाशी ठोठावलेल्या आरोपींपैकी पवन कुमार गुप्ता याने आपल्याला एक फेब्रुवारीला ठोठावल्या जाणाऱ्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी केली.

या याचिकेत त्याने दिल्ली उच्च न्यायलयाने 19 डिसेंबरला न्यायलयाच्या निकालाला स्थगिती देण्याची मागणी केली. वकीलांनी न्यायलयात खोटी कागदपत्रे सादर केली आणि न्यायालयाच्या सुनावणी वेळी अनुपस्थित राहिल्याबद्दल या याचिकेत नापसंती व्यक्त केलीआहे. विनय शर्मा (26), मुकेश कुमार (32), अक्षय कुमार सिंग (31) आणि पवन यांना 1 फेब्रुवारीला फाशी ठोठवावी, असे नवे डेथ वॉरंट आजच जारी केले आहे.

त्यापुर्वी सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुकेश याच्या दयेचा अर्ज फेटाळला. अन्य तीन आरोपींनी फाशीपासून वाचण्यासाठी राष्ट्रपतींकडे अद्याप दयेचा अर्ज केला नाही. तसेच अक्षय आणि पवन यांनी अद्याप सर्वोच्च न्यायलयात दुरूस्ती याचिका दाखल केली नाही.

ए. पी सिंग या वकीलांपार्फत दाखल केलेल्या याचिकेत हा गुन्हा घडला त्यावेळी म्हणजे 16 डिसेंबर 2012ला पवन गुप्ता हा अल्पवयीन असल्याचा दावा केला आहे. मात्र हा त्याचा दावा त्याने त्याला ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात सर्वोच्च न्यायलयात गेल्यावर्षी नऊ जुलैला केला होता. तो सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला होता.

उच्च न्यायलयात दाखल केलेल्या याचिकेत त्याने आपली जन्म तारीख शाळेतील दाखल्यानुसार आठ ऑक्‍टोबर 1996 असल्याचे म्हटले होते. त्याने खटला चालवला जात असलेल्या न्यायलयात हा दावा प्रथम केला होता. तो गेल्यावर्षी 21 डिसेंबरला फेटाळला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.