मुंबई – डिसेंबर अखेर आला असल्याने सध्या सर्वजण नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनची तयारी करत आहेत. यात बॉलीवूड सेलेब्सही आघाडीवर आहे. याबाबत अभिनेत्री दिशा पटनीने नवीन वर्षाची सुरुवात कशी करणार असल्याचे प्लॅनिंग सांगितले आहे.
View this post on Instagram
दिशा पटनीने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीत सांगितले की, ती नवीन वर्षानिमित्त एका हॉलीवूड स्टारसोबत डेट करण्याचे नियोजन करत आहे. दिशाने ट्विट करत लिहिले की, मी बेयॉन्से (इशूेपश’) सोबत डेटवर जाणार आहे.’
View this post on Instagram
दरम्यान, हे एक पोल ट्विट होते, ज्यात असे विचारले गेले होते की सन 2021 हे वर्ष खास कसे ठरले… यावर उत्तर देत दिशाने ही टिप्पणी केली आहे. दिशाचे हे ट्विट सध्या खूप व्हायरल होत आहे. या ट्विटवर टायगर श्रॉफचे चाहते गमतीदार प्रतिक्रिया देत आहेत.
View this post on Instagram
फिल्म इंडस्ट्रीत टायगर श्रॉफ आणि दिशा पटनी यांची जोडीची सर्वाधिक चर्चित जोडीपैकी एक आहे. काही दिवसांपूर्वीच दिशा-टायगर यांना मालदीव येथे व्हेकेशन एन्जॉय करताना स्पॉट करण्यात आले होते. या व्हेकेशनचे अनेक फोटो त्यांनी शेअर केले होते. वर्क फ्रंटबाबत सांगायचे झाल्यास दिशा पटनी अखेरच्या वेळी “मलंग’मध्ये झळकली होती.
View this post on Instagram