बराक ओबामा यांनी आपल्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ पुस्तकाची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. त्यांनी या पुस्तकात राजकीय प्रवासापासून ते खासगी गोष्टींपर्यंत अनेक गोष्टींवर ओबामा यांनी भाष्य केलं आहे.
त्यांनी या पुस्तकात आपले बालपण हे रामायण, महाभारतामधील गोष्टी ऐकत गेल्याचे म्हटले आहे. त्यांनी या पुस्तकात लिहिले आहे की, ‘भारत आणि तेथील संस्कृतीबद्दल आपल्या मनात कायम विशेष स्थान राहिलं आहे. याचं मुख्य कारण म्हणजे इंडोनेशियामध्ये बालपण गेलं असून तिथे मी बालपणी रामायण, महाभारतामधील गोष्टी अनेकदा ऐकल्याचा उल्लेख ओबामांनी केला आहे.’
दरम्यान, या पुस्तकात राहुल गांधी यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. राहुल गांधी हे ‘नर्व्हस’ आणि कमी योग्यतेचे नेते असल्याचं ओबामा यांनी म्हटलं आहे. यावरून देशातील राजकारण चांगलेच तापले आहे.