मी पाऊस…

मी पाऊस,
माझं कोसळणं,
बरसणं, रिमझिमणं,
सगळं सगळं तुम्ही
माणसांनी नीरस केलंत,
अनेक मार्गांनी त्यातला
आनंद घालवला,
झाडं माझ्यामुळे वाढतात,
माझं स्वागत करायला
आतुर असतात,
पण तुम्ही ती तोडलीत,
डोंगरावरुन ढग
मज्जेत जातात पण
तुम्ही डोंगर-टेकड्याच फोडल्यात,
त्यामुळे मीही अस्ताव्यस्त
कसाही कोसळतोय,
पण तो आटोक्‍यात आणणं
तेही तुमच्या हातात आहे,
बघा, ठरवा…

– डॉ. नीलम ताटके

Leave A Reply

Your email address will not be published.