मी इंद्राणी मुखर्जीला कधी भेटलोच नाही

पी.चिदंबरम यांचे न्यायालयात स्पष्टीकरण

नवी दिल्ली : आयएनएक्‍स मीडिया प्रकरणात सध्या अटकेत असलेले माजी अर्थमंत्री आणि कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनी आपण कधीही इंद्राणी मुखर्जी यांची भेट घेतली नसल्याचे म्हटले आहे.दिल्ली उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी चिदंबरम यांनी इंद्राणी मुखर्जींना भेटलो नसल्याचे सांगितले. इंद्राणी मुखर्जी या आयएनएक्‍स मीडियाच्या सहसंस्थापक होत्या. या प्रकरणात त्या माफीच्या साक्षीदार झाल्या असून, चिदंबरम यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे त्यांनी समर्थन केले आहे.

इंद्राणी मुखर्जी यांनी केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) दिलेल्या माहितीनुसार त्यांनी चिदंबरम यांची 2006 मध्ये भेट घेतली होती. नॉर्थ ब्लॉकमध्ये चिदंबरम यांच्या कार्यालयात ही भेट झाली होती. त्यावेळी चिदंबरम देशाचे अर्थमंत्री होते. त्यावेळीच चिदंबरम यांनी आपल्याला आपला मुलगा कार्ती याला भेटण्यास सांगितले होते. तो तुम्हाला मदत करेल, असे चिदंबरम त्यावेळी म्हणाले होते, असे इंद्राणी मुखर्जी यांनी सीबीआयला सांगितले आहे. या प्रकरणात 21 ऑगस्टला चिदंबरम यांना नवी दिल्लीमध्ये अटक करण्यात आली. दोन आठवडे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केल्यानंतर ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने चिदंबरम यांचा जामिनाचा अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)