भिलार : येथील संजीवन क्रीडांगणावर आय लव्ह पाचगणी या फेस्टिवल रंगणार असून शुक्रवार, दि. 17 जानेवारी रोजी चार वाजता अभिनेत्री फुलवा खामकर, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, पोलीस उपाधीक्षक भालचिम, दैनिक प्रभातचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे, महाबळेश्वर तहसीलदार तेजस्विनी पाटील, पाचगणी नगरपालिकेचे मुख्य कार्याधिकारी निखिल जाधव यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा होणार आहे.
हा फेस्टिवल दि. 17, 18 व 19 असा तीन दिवसासाठी आयोजित करण्यात आलेला आहे. फेस्टिवलमध्ये दैनिक प्रभात मीडिया पार्टनर म्हणून सहभागी आहे. उद्घाटन समारंभाची सुरुवात गाणे, संगीत, नृत्य व कलागुणांनी होणार आहे. तदनंतर चित्रकला प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे. या प्रदर्शनामध्ये बोलके बाहुले ,कला प्रदर्शन ,सुंदर चित्रकला प्रदर्शन अशा अनेक चित्रांचा येथे खजिना ठेवण्यात आलेला आहे. सकाळी दहा ते पाच या वेळामध्ये रिवाईन हॉटेल पाचगणी या हॉटेल शेजारी पॅरारालाइटिंगचा मनसोक्त आनंद पर्यटकांना लुटता येणार आहे.
दि. 17 जानेवारी या दिवशी सायंकाळी सहानंतर म्युझिकल व बँड पथक यांचा कलाविष्कार पर्यटकांना व रसिकांना अनुभवता येणार आहे. यामध्ये अनेक नामवंत म्युझिकल बँड सहभाग घेणार आहेत. या मध्येच अॅमेझॉन पार्क यांच्यामार्फत विविध खेळणी ठेवण्यात आलेले आहेत. यात अनेक राइट्स आहेत, पाळणे आहेत व अनेक लहान मुलांना आनंद घेता येईल अशा खेळण्याचा ही सहभाग आहे.
दि. 18 जानेवारी रोजी या उत्साहाची सुरुवात पॅरालायटिंगने करण्यात येणार आहे. हे पॅरालाइटिंग रिवाईन हॉटेल पाचगणी या ठिकाणी सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये पर्यटकांना करता येणार आहे. सुरुवातीला अॅमेझॉन पार्क यांच्यातर्फे तीन नंतर लहान मुलांना खेळण्यासाठी पार्क खुले करण्यात येणार आहे. दुपारी चार नंतर म्युझियम बँड यांची मैफिल लागणार आहे. त्याच दरम्यान याच ठिकाणी कला प्रदर्शन, ढोल पथक यांचेही सादरीकरण होणार आहे. युथ फेस्टिवल मध्ये कॉलेजचे तरुण-तरुणी आपली कला सादर करणार आहेत. या दिवशी आकर्षणाचे केंद्र म्हणजे फुलवा खामकर यांचे नृत्य संगीत याची झलक आपणास पाहायला मिळणार आहे.
दि. 19 जानेवारी रोजी या फेस्टिवलचा दुसरा दिवस सुरू होणार आहे. या दिवसाची सुरुवात सकाळी दहा वाजल्यापासून पॅराग्लायडिंगने होणार आहे. सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत कलाप्रदर्शन भरवण्यात येणार आहे. यामध्येच सायंकाळी सहा वाजता फॅशन शो आहे. या फॅशन शोमध्ये अनेक तरुण-तरुणी व नामवंत मॉडल भाग घेणार आहेत. सायंकाळी चार नंतर संगीत रसिकांसाठी म्युझिकल बँडचे आयोजन करण्यात आलेले आहे या संगीतच्या मैफलीमध्ये नामवंत बँड वादक सहभागी आहेत. याच ठिकाणी पाच वाजता युथ फेस्टिवल रंगणारआहे.
फेस्टिवल मध्ये 19 तारखेला सायंकाळी आठ नंतर पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात लकी ड्रॉ कुपन खोलण्यात येणार आहेत व चार चाकी गाडी, पासून दोन चाकी गाडी व इतर अनेक भेटवस्तू या लकी ड्रॉ लागलेल्या व्यक्तींना देण्यात येणार आहेत. सर्व रसिक मंडळी व पर्यटकांनी या पाचगणी फेस्टिवलचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी पाचगणीला यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.