Neena Kulkarni Post | मराठमोळी अभिनेत्री नीना कुलकर्णी यांच्या निधनाचे वृत्त काही युट्युब चॅनेल्स शेअर करत आहेत. यावर अनेकांनी दु:ख आणि संवेदनाही व्यक्त केल्या आहेत. परंतु नीना कुलकर्णी या जिवंत असून त्यांनी निधनाच्या अफवांना पूर्णविराम दिला आहे. तसेच त्यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे सदर चॅनेलला खडेबोल सुनावले आणि त्यांची प्रकृती उत्तम असल्याबद्दल स्पष्टीकरण दिलं.
निधनाच्या व्हायरल बातम्या आणि अफवांना कंटाळून नीना कुलकर्णी यांनी यावर मौन सोडलं आहे. “युट्युबवर माझ्या निधनाची खोटी बातमी पसरवली जात आहे. मी जिवंत आहे आणि देवाच्या कृपेने उत्तम कामही करत आहे. कृपया अशा प्रकारच्या अफवा पसरवू नका किंवा त्याला खतपाणी घालू नका. देवाच्या कृपेने मला उत्तम आयुष्य लाभो,” अशी पोस्ट नीना यांनी शेअर केली आहे. नीना यांच्या या पोस्टमुळे त्यांच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. Neena Kulkarni Post|
सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाली आहे. याआधीही अनेक कलाकारांच्या निधनाच्या चुकीच्या अफवा सोशल मीडियावर पसरले आहेत आणि त्याबद्दल कलाकारांनी संतापही व्यक्त केला आहे. मात्र तरीही हे प्रकार अद्यापही सोशल मीडियावर सुरु असल्याचे दिसत आहे. दरम्यान, नीना सध्या स्टार प्रवाहवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत पाहायला मिळत आहे. Neena Kulkarni Post |
हेही वाचा:
अजित पवारांना कार्यकर्त्यांनी दिली खास भेटवस्तू; पण पाटीवर लिहिलेला ‘तो’ शब्दच झाकला