प्रत्येक चित्रपटातून मी काही न काही शिकले – डायना पेंटी

हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री डायना पेंटीने आपल्या आठ वर्षांच्या कारकिर्दीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती म्हणते की, हा एक चांगला शिकण्याचा अनुभव आहे आणि आतापर्यंतच्या प्रत्येक
चित्रपटाने तिला काहीतरी नवीन शिकवले आहे. या अभिनेत्रीने 2012 मध्ये सैफ अली खान आणि दीपिका पादुकोणसोबत “कॉकटेल’ या हिट चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले आहे.

एका मुलाखतीत डायना म्हणाली, चित्रपटसृष्टीतील माझा हा प्रवास खूपच चांगला आहे आणि यातून मला बरच काही शिकता आले. तसेच मला एक चांगला अनुभव मिळत आहे. प्रत्येक चित्रपटाने मला
हस्तकला, प्रोफेशन आणि लोकांबद्दल काहीतरी नवीन शिकवले. माझ्या प्रवासादरम्यान मला काही आश्‍चर्यकारक आणि अतिशय हुशार लोकांसोबत काम करण्याची संधी देखील मिळाली आहे.

दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात अभिनेत्री डायनाने मुंबई पोलिसांना मदत व पाठबळ देण्यासाठी “खाकी’ नावाचा एक उपक्रम राबविला आहे. यातून करोनाविरोधात लढा देणा-या पोलिसांचे मनोधैर्य
वाढविण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यात आली. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास डायना लवकरच “शिद्दत’ या रोमॅंटिक नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.