आय-लीग फुटबाॅल : रियल काश्मीर-पंजाब एफसी सामना बरोबरीत

श्रीनगर : आय लीग फुटबाॅल स्पर्धेमध्ये रियल काश्मीर एफसी आणि पंजाब एफसी सामना १-१ असा बरोबरीत सुटला.

पंजाब एफसीच्या माकन चोथेने सामन्याच्या पूर्वार्धात २१ व्या मिनिटाला गोल करत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली होती.

त्यानंतर ६१ व्या मिनिटास रियल काश्मीरतर्फे ग्नोहेर क्रिझोने गोल करत संघास १-१ ने बरोबरी साधून दिली.

सामन्याच्या शेवटपर्यत ही बरोबरी कायम राहिल्याने अखेर हा सामना बरोबरीत संपला.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here