नवी दिल्ली : आय लीग फुटबाॅल स्पर्धेमध्ये नेरोका एफसीने रियल काश्मीर संघावर १-० ने मात करत विजय मिळविला. या स्पर्धेत चार सामन्यानंतर नेरोकाने विजय संपादित केला.
All over in Imphal as @NerocaFC register an emphatic victory 🤩 over @realkashmirfc today
NFC 1️⃣-0⃣ RKFC#HeroILeague 🏆 #IndianFootball ⚽️ #LeagueForAll 🤝 #NFCRKFC ⚔️ pic.twitter.com/tIHYg4s7OT
— Hero I-League (@ILeagueOfficial) January 14, 2020
नेरोका एफसी संघाकडून बौबाकर डियाराने ६२ व्या मिनिटाला गोल करत १-० ने आघाडीवर नेले होते. त्यानंतर प्रतिस्पर्धि संघाला गोल करण्यात अपयश आल्याने शेवटपर्यत ही आघाडी कायम राहिली आणि नेरोकाने हा सामना १-० ने खिशात घातला.
या विजयासह ‘नेरोका एफसी’चा संघ ७ सामन्यातील ८ गुणांसह गुणतालिकेत ७ व्या स्थानावर पोहचला आहे. दुसरीकडे रियल काश्मीरचा संघ ६ सामन्यातील ६ गुणांसह १० व्या स्थानी पोहचला आहे.