श्रीनगर : आय-लीग फुटबाॅल स्पर्धेतील सामन्यात मोहन बागान संघाने यजमान रियल काश्मीर संघाचा २-० ने पराभव करत विजय साकारला. या विजयासह मोहन बागान संघाने गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले आहे.
FULL TIME! @Mohun_Bagan pick up the 3⃣ points against @realkashmirfc thanks to 2⃣ second-half strikes! 👊💥
FT Score: RKFC 0⃣-2⃣ MB#RKFCMB ⚔️ #HeroILeague 🏆 #IndianFootball ⚽️ #LeagueForAll 🤝 pic.twitter.com/A9000VblcG
— Hero I-League (@ILeagueOfficial) January 5, 2020
बागान संघातर्फे या सामन्यात उत्तरार्धात जोसेबा बेतियाने ७१ व्या मिनिटाला तर नाँगडंबा नाओरेमने ७३ व्या मिनिटाला गोल नोंदवले.
स्पर्धेत मोहन बागानचे गुणतालिकेत १० तर रियल काश्मीरचे ५ गुण आहेत. घरच्या मैदानावर रियल काश्मीरचा मोहन बागानकडून दुसरा पराभव ठरला. याआधी मागील वर्षी घरच्या मैदानावर रियल काश्मीरला पराभव स्विकारावा लागला होता.