रायपूर – कॉंग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम यांनी पक्षाच्या मार्गापासून दूर जात म्हटले की, माझा ईव्हीएमवर पूर्ण विश्वास आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती (MP Karti Chidambaram) यांनी रायपूरमध्ये एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली.
कॉंग्रेस खासदार म्हणाले की, माझ्या वैयक्तिक मते ईव्हीएम हे एक मजबूत मशीन आहे. हे एक स्वतंत्र मशीन आहे. हे नेटवर्कवर काम करत नाही. माझा परिणामकारकतेवर पूर्ण विश्वास आहे आणि ईव्हीएमवर माझा पूर्ण विश्वास आहे.
In my personal opinion, EVM is a robust machine. It’s a standalone machine. It doesn’t operate on a network. I completely believe in the efficacy & my trust in the EVM is complete: Congress MP Karti Chidambaram, in Raipur, Chhattisgarh pic.twitter.com/FxIrERIuhs
— ANI (@ANI) February 25, 2023
कार्ती म्हणाले की, जोपर्यंत ईव्हीएमद्वारे मतदानाचा प्रश्न आहे, मला माहित आहे की माझ्या पक्षाचा दृष्टिकोन वेगळा आहे. हे माझे वैयक्तिक मत आहे आणि मी सातत्याने म्हटल्याप्रमाणे माझा ईव्हीएमवर विश्वास आहे. ज्या निवडणुकीत ईव्हीएमद्वारे मतदान झाले त्या निवडणुकांमध्येही आम्ही जिंकलो आहोत. असे असताना त्या मशिनवर अविश्वास कसा दाखवता येईल?
कॉंग्रेस पक्षाने रायपूर येथील अधिवेशनात निवडणुका, निवडणूक रोखे, ईव्हीएम आणि जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा यासह 58 कलमी राजकीय ठराव मंजूर केला. पक्षाने राजकीय मुद्द्यावरील ठरावात म्हटले आहे की, ते समविचारी पक्षांसोबत ईव्हीएमचा मुद्दा निवडणूक आयोगाकडे उचलण्यासाठी व्यापक सहमती तयार करतील आणि आयोगाने या विषयावर प्रतिसाद न दिल्यास न्यायालयात जावे.