नवी दिल्ली : गुरुवारी पाटणाहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात एका प्रवाशामुळे चांगलाच गोंधळ निर्माण झाला. एका प्रवाशाने त्याच्याजवळ बॉम्ब असल्याचे सांगितल्यानंतर सर्व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच बॉम्ब निकामी पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत विमानाची तपासणी करण्यात येत आहे. ज्या प्रवाशाने पाटणा विमानतळावर आपल्या बॅगेत बॉम्ब असल्याची धमकी दिली होती, त्याची बॅग तपासली असता कोणताही बॉम्ब सापडला नाही. यानंतर आरोपी प्रवाशाला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे.
Delhi-bound IndiGo flight grounded at Patna airport after bomb hoax, passenger detained
Read @ANI Story | https://t.co/Vh1ZLCS66G#PatnaAirport #BombHoax #DelhiBound pic.twitter.com/hvYR012YK6
— ANI Digital (@ani_digital) July 22, 2022
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री पाटण्याहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात ऋषी चंद सिंग बेदी नावाचा व्यक्ती आपल्या आई-वडीलांसोबत प्रवास करत होता. विमान उड्डाणाच्या काही मिनिटाअगोदरच त्याने आपल्या बॅगेत बॉम्ब असल्याची धमकी दिली. या धमकीनंतर विमानातील इतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्याच्या बॅगेची तपासणी करण्यात आली मात्र, बॉम्ब मिळाला नाही. त्यानंतर ऋषी चंदला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे.
घटनेनंतर सगळ्या प्रवाशांना विमानाच्या खाली उतरवण्यात आले असून सामानांची तपासणी करण्यात येत आहे. बॉम्ब शोधक पथकही घटनास्थळी दाखल झाले असून विमानाची कसून तापसणी करण्यात येत असल्याची माहिती पटना विमानतळाचे अधीक्षक चंद्रशेखर सिंग यांनी दिली. तसेच ऋषी चंद हा मानसिक रोगी असल्या कारणाने हे कृत्य केले आहे. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी करण्यात येत असल्याचे चंद्रशेखर सिंग म्हणाले.