सोलापूर – शिंदे गट आमदार प्रताप सरनाईक यांनी नुकतच तुळजा भवानी देवीचे दर्शन घेऊन देवीला ५१ तोळे सोन अर्पण केले आहे. प्रताप सरनाईक यांनी आपल्या कुटुंबीयांसह तुळजाभवानी देवीच्या मंदिरात दर्शनासाठी पोहोचले होते.
यावेळी माध्यमांशी बोलतांना सांगितले,’तब्बल ३७ लाख ५० हजार किंमतीचे ७५ तोळे सोन्याचे दागिने देवीच्या चरणी अर्पण केले. मी नवस केला होता आणि हा नवस मी फेडला आहे.’ असेही त्यांनी सांगितले आहे.
ते पुढे म्हणाले,’तुळजाभवानी देवी आमची कुलदैवत आहे. दोन्ही मुलांच्या लग्नाच्या वेळी आम्ही देवीला नवस बोललो होतो. आज माझ्या नातवंडांचं जावळ करायचं होतं. त्यामुळे नवस फेडण्यासाठी आम्ही सगळे कुटुंबीय देवीला आलेलो आहोत. ५१ तोळ्यांच्या पादुका आणि २१ तोळ्यांचा हार असा नवस मी देवीला बोललो होते. त्यानुसार आज सगळ्या कुटुंबाला घेऊन मी देवीचरणी लीन झालो. नवस फेडला.’