मी देशभक्ती, स्त्रीप्रधान सारखे चित्रपट दिले आणि तुम्ही….; कंगनाचे जया यांना प्रत्युत्तर

नवी दिल्ली  -भारतीय चित्रपटसृष्टीला बदनाम करण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे. ज्या लोकांनी या चित्रपटसृष्टीचा लाभ उठवला त्यांनीच या बदनामीच्या प्रकारात मोठा वाटा उचलला आहे. ज्या थाळीतून खाल्ले त्या थाळीतच घाण करण्याचा हा प्रकार आहे अशा शब्दात समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत आपला आवाज उठवला आहे.

जया बच्चन यांनी यावेळी कोणाचे नाव घेतले नाही. मात्र कंगना राणावत हिने या चित्रपटसृष्टीचा उल्लेख गटार असा केला होता. त्या पार्श्‍वभूमीवर जया बच्चन यांनी काल राज्यसभेत ही आगपाखड केली.  याच मुद्याला अनुसरून कंगनाने जया बच्चन यांच्या टीकेला उत्तर देणारं ट्विट केलं आहे.

काय म्हणाली कंगना

“जयाजी आणि त्यांच्या इंडस्ट्रीने कोणती थाळी दिली आहे. एक थाळी मिळाली होती ज्यामध्ये दोन मिनिटांचे आयटम नंबर्स आणि एक रोमँटिक सीन मिळायचा तोदेखील हिरोसोबत झोपल्यानंतर…मी इंडस्ट्रीला स्त्रीवादाचा धडा दिला. थाळी देशभक्ती, स्त्रीप्रधान चित्रपटांनी सजवली. जयाजी ही माझी थाळी आहे तुमची नाही”.

Leave A Reply

Your email address will not be published.