सोशल मीडियामुळे भान विसरलो

अभिनेत्री अलका कुबल : रांजणगावात हळदी- कुंकू

रांजणगाव गणपती- नारीशक्‍तीने देशाचा इतिहास बदलला आहे. इतिहास घडवला आहे. नारीशक्‍ती देशाचा भविष्यकाळ असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी केले. कारेगाव (ता. शिरूर) येथे रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन, महिला दक्षता समिती पोलीस स्टेशन यांच्या वतीने हळदी-कुंकू सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.

कुबल म्हणाल्या की, स्त्रियांमधील त्याग आणि समर्पण या गुणांमुळे आपण आपले जीवन चांगल्या पद्धतीने जगत असतो. मात्र, वाढत्या सामाजिक कारणामुळे सोशल मीडियामुळे महिला आपले भान विसरले आहे. त्यातून कुटुंब व्यवस्था बिघडली आहे. कुटुंब व्यवस्था स्थिर राहण्यासाठी महिलांचे योगदान मोलाचे असते. त्याकडे त्यांनी लक्ष दिले तर कुटुंब सुखी व समाधानी होऊ शकते.

याप्रसंगी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत, केंद्रीय महिला आयोगाच्या सदस्या वंदना पोटे, भारतीय मीडिया फाउंडेशनच्या सदस्या स्वाती मोराळे, महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा सुलभा नवले, कारेगावचे सरपंच अनिल नवले, ग्रामपंचायत सदस्य गणेश ताठे, विविध संस्थांच्या महिला पदाधिकारी व पंचक्रोशीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. हायर कंपनीच्या मनुष्यबळ विकास अधिकारी संचीता दास, पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांनी मनोगत व्यक्‍त केले. सूत्रसंचालन श्‍वेता ओस्तवाल यांनी केले. मनीषा पाचंगे यांनी आभार मानले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.