मुंबई – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 24 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतरही दोन गोष्टी सत्यात न उतरल्याची खंत बोलून दाखवली. विक्रमादित्य सुनील गावसकर यांच्यासह खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही, तसेच व्हिव रिचर्डस यांच्याविरुद्धदेखील खेळता आले नाही. याच गोष्टी आजही मला सतावतात, अशा शब्दांत सचिनने आपली खंत बोलून दाखवली.
सचिनने आपल्या मोठ्या कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले तसेच मोडले. मी माझ्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल अत्यंत आनंदी आहे. पण माझ्या कारकिर्दीत माझ्या दोन गोष्टी करता आल्या नाहीत, यांची खंत वाटते.
पहिली म्हणजे भारतीय संघात सुनील गावसकर यांच्याबरोबर खेळायला मिळाले नाही आणि दुसरी म्हणजे माझे आयडॉल असलेल्या विव्हियन रिचर्डसविरुद्ध मी मैदनात कधी उतरू शकलो नाही, अशी भावनाही सचिनने व्यक्त केली. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच काही वर्षांपूर्वी गावसकर निवृत्त झाले होते.
सचिनने 1989 साली पदार्पण केले. सचिनच्याच काळात रिचर्डस आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होते. मात्र, त्या कालावधीत वेस्ट इंडीज व भारत यांच्यात मालिकाच झाली नव्हती. रिचर्डस 1991 साली निवृत्त झाले.