मला शर्यतीमध्ये धावायचे नाही – तापसी

तापसी पन्नूचा “रश्‍मी रॉकेट’ दोनच दिवसांत रिलीज होणार आहे. गेल्या काही महिन्यांत क्रीडा विषयावरील आणखीन एक सिनेमा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या सिनेमात तापसी एका धावपटूच्या भूमिकेत असणार आहे.

 या धावपटूच्या रोलमुळे तिची इमेज आता शर्यतीतील आघाडीची स्पर्धक अशी झाली आहे. मात्र, तापसी स्वतः कोणत्याही स्पर्धेत असल्याचे मानत नाही. सध्या तरी तिला ती जिथे आहे त्यातच आनंद वाटतो आहे. दाक्षिणात्य सिनेमांमधून बॉलीवूडमध्ये आलेल्या तापसीने आपले स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.

 “मुल्क’, “सांड की आँख’, “मनमर्जियां’, “थप्पड’, “हसीन दिलरुबा’, “नाम शबाना’ आणि “पिंक’ या प्रत्येक सिनेमातील तिचा रोल चौकटीला छेद देणारा होता. आता “रश्‍मी रॉकेट’मधून तिची छबी आणखीन वेगळी असणार आहे. 

आता तिच्या सगळ्याच रोलमध्ये वेगळेपण दिसायला लागले आहे. त्यामुळे तिच्या नावाशी आघाडीची नायिका हे लेबल चिकटले आहे. मात्र, आपल्याला कोणत्याही शर्यतीत राहायचे नाही. उलट आपल्याला फिल्म इंडस्ट्रीमध्ये अधिक चांगले काम करायचे आहे. सध्या तरी आपल्याला आपल्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करायचे आहे, असे तिने म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.