नवी दिल्ली – सुपरस्टार रजनीकांत यांनी मोठा निर्णय घेतल आहे. त्यांनी राजकारणाला कायमचा रामराम केला असल्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर रजनी मक्कल मंद्रम हा त्यांचा पक्ष विसर्जित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. सोबतच ‘भविष्यात राजकारणात येण्याची माझी कोणतीच योजना नाही’, असेही रजनीकांत यांनी स्पष्ट केले आहे.
Actor Rajinikanth says he would discuss with the office bearers of Rajini Makkal Mandram whether he would enter politics or not in the future, ahead of today's meeting with fans pic.twitter.com/3ByCVTbfYQ
— ANI (@ANI) July 12, 2021
याविषय़ी माहिती देताना अभिनेते रजनीकांत म्हणाले की. रजनी मक्कल मंद्रम पक्ष विसर्जिक करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला असून फोरमच्या सदस्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला आहे. भविष्यात राजकारणात येण्याची माझी कोणतीच योजना नाही. रजनी मक्कल मंद्रम हा पक्ष विसर्जित होईल आणि त्याचे ‘रजनीकांत रासिगर नारपानी मंद्रम’ किंवा ‘रजनीकांत फॅन्स वेलफेअर फोरम’मध्ये रुपांतर करण्यात येईल.
"I don't have plans to enter politics in future," says actor Rajinikanth, dissolves Rajini Makkal Mandram pic.twitter.com/updoKb5HnY
— ANI (@ANI) July 12, 2021
राजकीय प्रवेशावरील अनेक प्रश्नांबाबत त्यात चर्चा केली जाईल. ‘मी राजकारणात प्रवेश करावा की नाही यावर आम्ही चर्चा करू. कोविड, निवडणुका, शूटिंग आणि अमेरिकेतील वैद्यकीय तपासणीमुळे मी याआधी कार्यकर्त्यांना भेटू शकलो नव्हतो’, असे रंजनीकांत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले आहेत.
"I have decided to dissolve Rajini Makkal Mandram. The office-bearers of the Rajinikanth Makkal Mandram would continue to be part of the Rajinikanth Fan Club Association that will involve itself in public service," says Rajinikanth
— ANI (@ANI) July 12, 2021