बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानने अवघ्या दोन वर्षांच्या कारकिर्दीत ग्लॅमरच्या जगतातील प्रसिद्धी आणि चाहत्यांचे भरपूर प्रेम मिळविले आहे. अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंह यांची मुलगी सारा लहानपणापासूनच इंडस्ट्रीशी परिचित आहे.
View this post on Instagram
तरी ती स्टारडमवर विश्वास ठेवत नाही. साराने एका मुलाखतीत सांगितले की, मला स्टारडम नको आहे. मी अद्याप चाहते हा शब्द वापरलेला नसून स्टार शब्दापासून खूपच लांब आहे. मला या सर्व गोष्टींवर विश्वास नाही. कारण प्रत्येक शुक्रवारी येथे कलाकारांचे भाग्य बदलत असते.
View this post on Instagram
सारा म्हणाली, “मला वाटतं की आपला हेतू हाच एक महत्त्वाचा विषय आहे. आपला उद्देश योग्य असल्यास आपली शक्ती, पॅशन आणि आवड जपली पाहिजे. कारण वेळेनुसार सर्व काही बदलत असते आणि बदलत राहणार, असे तिने सांगितले.
View this post on Instagram
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास सारा अली खान आणि वरुण धवन यांचा “कुली नंबर 1′ नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय अक्षय कुमार आणि धनुष यांच्या “अतरंगी रे’मध्येही ती झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल. राय करत आहे.
View this post on Instagram