‘मी पुरुषांसोबत झोपत नाही’; रमेश कुमार यांच्या वक्‍तव्याने नवीन वादंग

लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून नाराज उमेदवारांच्या पक्षातील एन्ट्री आणि एक्झिटचे सत्रच सध्या अवघ्या देशामध्ये पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे प्रचारा दरम्यान आपल्या वादग्रस्त विधानामुळे काही नेते चर्चेत आले आहेत. अशातच कर्नाटक विधानसभा अध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते रमेश कुमार यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के एच मुनियप्पा यांच्याशी संबंध असल्यासंबंधी प्रश्न विचारला असता त्यांनी ‘मी पुरुषांसोबत झोपत नाही’ असं उत्तर दिलं आहे. रमेश कुमार यांच्या विधानाने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला असून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुनियप्पा यांनी ‘रमेश कुमार आणि आपण पती, पत्नीप्रमाणे आहोत.आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नाही’ असं म्हटलं होतं. त्यानंतर आता मुनियप्पा यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना रमेश कुमार यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. ‘मी पुरुषांसोबत झोपत नाही. मी कोणासोबतही झोपत नाही. माझी एक पत्नी असून गेल्या दहा वर्षांपासून मी विवाहित आहे. मुनियप्पा यांना माझ्यासोबत झोपण्यात रस असू शकतो, पण माझी तशी कोणतीही इच्छा नाही. माझे कोणाशीही कोणतेच संबंध नाहीत’ असे रमेश कुमार यांनी म्हटले आहे. रमेश कुमार यांच्या वादंग वक्‍तव्याने लोकसभा निवडणुकांपुढे देशभरामध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असतांना वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)