मुंबई – टीव्ही अभिनेत्री ‘श्वेता तिवारी’ तिच्या सौंदर्य आणि अभिनयामुळे चर्चेत असली तरी यावेळी तिने दिलेल्या एका वक्तव्यामुळे ती वादात सापडली आहे. श्वेताने पत्रकार परिषदेत ‘आपल्या ब्रा चे माप साक्षात देव घेत आहे….’ असं आक्षेपार्ह विधान केले होते.
यानंतर मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी अभिनेत्रीच्या वादग्रस्त वक्तव्यावर कठोर भूमिका घेत हे खपवून घेतले जाणार नाही. असं सांगत चौकशीचे आदेश दिले आहेत. श्वेता तिच्या आगामी वेब सीरिजच्या प्रमोशनदरम्यान भोपाळमध्ये दाखल झाली होती. त्यावेळी तिने हे विधान केलं.
श्वेता तिवारी स्टेटमेंटमध्ये काय म्हणाली….
“माझ्या सहकलाकाऱ्याच्या मागच्या एका भूमिकेवरून माझ्या या विधानाचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. जेव्हा हा पूर्ण व्हीडिओ पाहिला जाईल तेव्हा लक्षात येईल की ‘भगवान’शी संबंधित मी जे बोलले ते सौरभ राज जैन याच्या प्रसिद्ध देवतेच्या भूमिकेला अनुसरून होतं.
View this post on Instagram
नेटकरी एखाद्या भूमिकेच्या नावाला कलाकारांच्या नावाशी जोडतात. माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. पण तरीही कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांनी माफी मागते.’