मुंबई – वसंतोत्सवात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विविध गोष्टींवर सडेतोड उत्तरे दिली. राज ठाकरेंनी राजकारणावर तसेच स्वतःच्या आवडीबाबतच्या विविध गोष्टी यावेळी मनमोकळ्यापेनाने सांगितल्या. यावेळी बोलताना त्यांनी मुलगा अमित ठाकरेंसह पत्नी शर्मिला ठाकरे यांच्याबाबत देखील भाष्य केले. राज ठाकरेंनी यावेळी रश्मी ठाकरे यांना कुत्रा चावल्याचा प्रसंग देखील सांगितलं.
राज ठाकरे म्हणाले,”एकेदिवशी माझी पत्रकार परिषद होती. मी बाजुच्या रुममधून तयार होऊन पत्रकार परिषदेला जात होतो. तेवढ्यात ती तोंड धरून आली. मला हाताने बाजुला हो म्हणत बाथरुममध्ये गेली. मी खाली बघितलं तर सगळीकडे रक्ताचे डाग दिसत होते. तिच्या ओठांचे पाच तुकडे झाले होते, त्यावेळी काय करावं, मलाच सुचत नव्हतं, असे ते म्हणाले.
अमित ठाकरेंच्या राजकारणाबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले,मी अमितला राजकारणात आणू शकतो, लादू शकत नाही. बाप म्हणून त्याला आणण्याचे माझे काम आहे.स्वीकारायचे की नाही हे काम तुमचे आहे. स्वीकारा किंवा नाकारा. मी तुम्हाला जबरदस्ती करु शकत नाही, असे स्पष्ट करीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तरुणांना राजकारणात येण्याचे आवाहन केले.
सध्या ओरबाडणे सुरू
राज ठाकरेंनी राजकीय स्थितीवर भाष्य करीत सध्या ओरबाडणे सुरू आहे असे म्हटले. राजकारणात माणसे वाईट असतील पण राजकारण वाईट नाही. जर वाईट असेल तर येऊन साफ करा. नाक मुरडून चालणार नाही, असेही त्यांनी पुढे बोलताना म्हटले.