लंडन – एखाद्या व्यक्तीने आयुष्यभर लग्न न करण्याबाबत विशिष्ट कारण असू शकते पण लंडनमधील एका महिलेचे लग्न न करण्याचे कारण अनोखे म्हणावे लागेल वीरा बँटींग नावाच्या या महिलेने नुकतीच आपल्या वयाची शंभर वर्षे पूर्ण केली आहेत इतका दीर्घकाळ जीवन साथी शिवाय व्यतीत करणाऱ्या वीराने त्या निमित्ताने आपण लग्न का केले नाही याचे गुपित उघड केले
आपला शंभरावा वाढदिवस वीराने ज्या घरात साजरा केला त्या घरात ती जन्मापासून म्हणजे गेली शंभर वर्षे राहात आहे 1921 मध्ये ती फक्त सहा महिन्यांची असताना तिच्या वडिलांनी हे घर खरेदी केले होते त्या घराच्या एवढ्या प्रेमात पडली होती की की हे घर सोडून कुठेही बाहेर जाण्याची कल्पना तिला करवत नव्हती याच एका कारणाने तिने लग्न न करण्याचा निश्चय केला होता इंग्लंडमधील सर्वात सुंदर जागा मानण्यात आलेल्या लेक डिस्ट्रीक्ट परिसरामध्ये वीराचे हे सुंदर घर आहे.
त्यामुळेच हे घर तिला सोडायचे नव्हते विराचे जेव्हा लग्नाचे वय झाले होते तेव्हा तिला चांगल्या प्रकारचे चार प्रस्तावही आले होते पण घर सोडून जाण्याची कल्पना सहन होत असल्याने तिने सर्व प्रस्ताव नाकारले होते वीराला आणखी एक मोठी बहीण आणि एक छोटा भाऊ आहे या दोघांनीही आपापल्या व्यवसायाच्या किंवा लग्नाच्या निमित्ताने हे घर सोडले होते त्यामुळे सध्या शंभर वर्षाची वीरा या मोठ्या घरात एकटीच राहात आहे या शंभर वर्षांच्या कालावधीमध्ये वीराने या परिसरात अनेक बदल झालेले पाहिले
सध्या तिच्या घराच्या अवतीभोवती अनेक अपार्टमेंट्स आणि बंगले झाले आहेत पण वीराला मात्र सत्तर ऐंशी वर्षांपूर्वीचे आपले घर आणि या घराबाहेरील परिसर आठवतो लहानपणी खेळण्यासाठी आम्ही घराबाहेर मैदानात जात असू पण आता या परिसरात लहान मुलांना खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध नाहीत अशी खंत तिने यानिमित्ताने व्यक्त केली.