श्रीगोंदा – जामखेड या राष्ट्रीय महामार्गावरील आढळगाव ते जामखेड या 62.77 की.मी दुपदरीसाठी 399.33 कोटी मंजूर झाले आहे. आमदार रोहित पवार व राम शिंदे दोघेही या कामाचे श्रेय घेत आहेत. दरम्यान मंत्री असतांना काही केलं नाही, आणि आता रोहित पवारांनी मंजूर करून आणलेल्या कामच श्रेय माजी मंत्री राम शिंदे घेत आहेत अशी टीका कर्जत राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
काही दिवसांपूर्वी आपली भेट घेऊन मतदारसंघातील रस्त्यांसाठी निधीची मागणी केली होती. याचा मान ठेवून आपण भरीव निधी मंजूर केलात याबाबत माझ्या मतदारसंघातील नागरिकांच्यावतीने @nitin_gadkari साहेब आपले मनापासून आभार! या रस्त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होण्यास निश्चित मदत होईल! https://t.co/l4sz8HipRX pic.twitter.com/8wXZR9si8K
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 4, 2021
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या ट्विटरवर ट्विट करत श्रीगोंदा – जामखेड या राष्ट्रीय महामार्गावरील आढळगाव ते जामखेड या 62.77 की.मी दुपदरीसाठी 399.33 कोटी मंजूर झाल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे या कामासंदर्भात रोहित पवार यांनी दिल्लीत जाऊन नितीन गडकरी यांची भेट घेऊन यासंदर्भात मागणी केल्याचे ट्विट केले होते. याचदरम्यान चार एप्रिल ला नितीन गडकरी यांनी या आपल्या ट्विटरवर ट्विट करत या संदर्भात माहिती दिली.
रोहित पवार यांनी ज्या पद्धतीने गडकरी यांची भेट घेतली व त्या भेटी मागचे काय कारण आहे हे आपल्या ट्विटरद्वारे सांगितले होते, त्याचपद्धतीने राम शिंदे यांनी नितीन गडकरी यांची कधी भेट घेतली व त्याचे स्वरूप काय याचा पुरावा शिंदे यांनी दाखवावा असेही कर्जत राष्ट्रवादी काँग्रेसने म्हंटले आहे.
शिंदे यांना स्वतःहा मंत्री असतांना काही करता आले नाही, आणि आता रोहित पवारांनी आणलेल्या कामच श्रेय घेण्याच काम ते करत आहेत. रोहित पवारांनी आणलेल्या कामाचं फुकटचं श्रेय राम शिंदे यांनी घेऊ नये. असेही कर्जत राष्ट्रवादी काँग्रेसने म्हंटले आहे.