Dilip Sopal : महापालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यात महायुती असली तरी नगरपरिषद आणि महापालिका निवडणुकीत वेगळे चित्र बघायला मिळाले. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही तशाच प्रकारचे चित्र पाहायला मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत दोन्ही शिवसेना एकत्रित येत महाआघाडी स्थापन करण्यात आली आहे. या महाविकास आघाडीची राज्यात जोरदार चर्चा सुरू असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आमदाराने जाहीर सभेतून या आघाडीबाबत मोठा खुलासा केला आहे. हेही वाचा : Prithviraj Chavan : “अदानी, लोढांंसारख्या स्थानिक कंपन्याबरोबर करार हा एक क्रूर विनोद”; माजी मुख्यमंत्र्यांचे दावोस दौऱ्यावर भाष्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी “दोन्ही शिवसेना एकत्रित हे मी घडवून आणलं नाही ते घडून आलेलं आहे, असा खुलासा केला आहे. एकीकडे मुंबई महापालिका निवडणुकीनंतर दोन्ही शिवसेना एकत्र यावेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्याच महापौर बसवा असे विधान आमदार भास्कर जाधव यांनी केले होते. दुसरीकडे सोलापुरातील बार्शी तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्याने चर्चांना उधाण आले आहे. दोन्ही राष्ट्रवादीची देखील महाआघाडी झाली आहे. भाजपच्या विरोधात ही आघाडी तयार करण्यात आल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे गटाचे आमदार ॲड. दिलीप सोपल नेमकं काय म्हणाले आमदार दिलीप सोपल ? ‘काहीजण म्हणले, मला मशालीवर लढायचं ओके. काहीजण म्हणले, घड्याळ पाहिजे. घड्याळ घेऊन टाका. घड्याळाबद्दल प्रेम असणारे कार्यकर्ते त्यांनी घड्याळ मागितलं. काहीजण म्हणले, बाणाने आणि काय केलं. बाण आम्हाला पाहिजेल. त्यांना म्हणलं, बाण घेऊन उभा रहा’, असे आमदार दिलीप सोपल म्हणाले. ओढून ताणून काही आलेलं नाही, असे देखील सोपल यांनी स्पष्ट केले आहे. हे केल्याशिवाय बार्शी तालुक्याला आता पर्याय नव्हता, असे म्हणत आमदार दिलीप सोपल यांनी दोन्ही शिवेसना एकत्रित येण्यावर भाष्य केले आहे. येत्या ५ फेब्रुवारी रोजी राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सोलापूर जिल्ह्यात केली जात आहे. दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणामुळे येथील स्थानिक राजकारणातील समीकरणे बदलणार आहेत. बार्शीत भाजपविरोधात सर्व पक्ष एकत्रित येत महाविकास आघाडी स्थापन केल्याने याची राज्यभरात जोरदार चर्चा होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार दिलीप सोपल यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत मेळाव्याला येण्याचे आवाहन केले होते. हेही वाचा : Eknath Shinde : “ईडी, सीबीआय आणि पोलिसांच्या जोरावर भाजपाचा कारभार,” बड्या नेत्याची टीका; पुढील निवडणुकांपूर्वी शिंदेंच्या पक्षाबाबतही केला मोठा दावा